Saturday, February 11, 2012

युवी...वि आर मिसिंग यु !!


युवी ..युवराज .. क्रिकेट वर राज करणारा तो युवराज .. भारताचा नायक .. क्रिकेट साठी लढणारा लाढविय्या एकदम अचानक पटागांतून दिसेनासा झाला .. आणि लढू लागला आयुष्याची लढाई ..
खूप वाईट वाटले जेव्हा युवीच्या आजार बद्दल कळले आणि एकदम आठवली ती जाहिरात "जब तक बल्ला है थाट है .. नही तो ?"
जेव्हा पाहिल्यांदा त्याच्या आजार बद्दल पपेर मध्ये कळले तेव्हा कुठे तरी पाल चुक्चुकून गेली कि नक्की काय आहे ..पण काही दिवसातच बातमी आली आणि मन अस्तीर झाल ..
मनुष्याच जीवन इतक नाजूक रेशमी धागा असतो का ? .. कि तो कधी हि विरू लागतो आणि आयुष्याची लढाई चालू करून देतो, हि गोष्ट कोणीच सांगू शकत नाही .. युवी ची बातमी कळल्यावर माझ्या डोळ्या समोर त्याचे सगळे चांगले दिवस एका मागून एक येवून गेले .. त्याची प्रेमप्रकरणे , त्याचे ते एकाच ओवर मधले ६ षटकार .. आणि त्याला मिळालेली वाह वाह .. त्याचे चित्रपट ताराकाबरोबराचे नाच .. त्याच्या सगळ्या जाहिराती आणि मग ... तो विश्व विजेता होण्याचा मान आणि जगलेल ते स्वप्न .. सगळ्यांचच ! जे पूर्ण करण्यामध्ये त्याचा फारच मोलाचा वाटा आहे. विश्वजेत्ते पद मिळाल्या नन्तर त्यांनी व्यक्त केलेला आनंद उत्सव ... शब्द नाहीयेत त्या गोष्टी सांगण्यासाठी .. आणि आपण सगळ्यांनीच ते पाहिलंय आणि अनुभवलाय !
काळ कसा एका शक्नात बदलतो आणि होत्याच नवत करतो .. युवीच्या सगळ्या जाहिराती आता कोणी तरी वेगळे लोक करत आहेत फक्त एकच जाहिरात अजूनही तशीच आहे एका बदला सह .. "जब तक बल्ला है थाट है .. नही तो , जिंदगी भी क्या रंग दिखती है .."
युवी लवकरच छान बर होऊन पटागांत परत येईल आणि त्याच्या त्याच कातील खेळातून पुन्हा आपल्या देशाच नाव पुढे आणील असाच मला मनापासून वाटत आणि मला वाटत असाच सगळ्यांना हि वाटत असेल ..
युवी वि मिस यु !!

No comments:

Post a Comment