Tuesday, January 3, 2012

डॉन २


आज डॉन २ पाहिला , चित्रपटाला खुपच छान वेग आहे. आपण मनात काही विचार करण्याच्या आताच पुढची गोष्ट आपल्या समोर येते .. त्यामुळे चित्रपट पाहताना अजिबात कंटाळा येत नाही .. फरान ने खुपच छान कथानक जागवलय ..
चित्रपटाचा वेग आणि सगळे भारत बाहेरचे लोकेशन असल्या मुळे आपल्या कुठे तरी होलीवूड चित्रपट बघण्याचा भास होता आणि फरान ते आगदि ८० % जमल आहे .. ह्या चित्रपट मध्ये हि शेवट आपल्याला चक्रावून जातो जस डॉन १ मध्ये जातो.
बाकी सस्पेन्स छान घेतलाय .. चित्रपट गृहात जावून बघायला काहीच हरकत नाही. डॉन चे केस छान दिसतात नेहेमीच्या केसांपेक्षाही पण चेहेरा अर्रे बापरे त्यांनी आता वय झालेल्या लोकांचे रोल करावेत म्हणजे काका मामा वा वडील .., प्रियांका चोप्रा फारच साधी दिसलेय (gal next door) म्हंजे तशी ती काही छान नाहीच आहे पण मोठ्या पडद्या वर तरी ती चांगली दिसते ..पण डॉन २ ह्या साठी अपवाद ठरेल कारण बहुटेक तिच्या मेकउप कडे कोणी लक्ष्य दिलच नाहीये .. जास्त करून तीच नाक त्याला काहीच शेप च नाहीये मेकउप वाला बहुतेक विसरून गेला नाकाला रंगवायला ..
बर असो, सगळ्यात आचर्य मला वाटल ते म्हंजे प्रियांकाचा पोलीस मित्र अर्जुन .. म्हंजे छान वाटल मला त्याला त्या मोठ्या पडद्या वर पाहून कारण तो माझ्या गावाचा आहे .. लोक कशी छान पुढे जातात हे त्याच्या कडे पाहून कलात .. छोट्या गावातून एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसन आणि ते हि एवढ्या मोठ्या लोकांबरोबर .. खरच hatsoff to him ... !!
त्यामुळे चित्रपत तुम्ही पाहू शकता , अजिबात कंटाळा येत नाही ... फक्त डॉन च प्रियांका वरच प्रेम थोड पटत नाही .. गोष्टीला रुचत नाही ..

No comments:

Post a Comment